फळपीक विमा नुकसान भरपाई येत्या चार दिवसात न मिळाल्यास बेमुदत आंदोलन…
⚡वेंगुर्ला ता.०७-: पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना सन २०२२-२३ अंतर्गत अद्यापही देय भरपाई मिळाली नसल्याने शेतक-यांमध्ये तीव्र नाराजी आहे. ६ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ला तालुक्यातील शेतक-यांनी कृषी कार्यालयासमोर केलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले. मात्र येत्या ४ दिवसात देय भरपाई न मिळाल्यास पुनश्च याच कार्यालयासमोर १० नोव्हेंबर रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे….
