पाडलोस, आरोस, दांडेली, न्हावेलीतील ग्रामस्थांत संताप : गुरुवारी 9 रोजी होणार बैठक..
⚡बांदा ता.०७-:
पाडलोस, आरोस, दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी परिसरातील वीज समस्या सोडविण्यासाठी पाडलोस ग्रामपंचायत येथे आज मंगळवारी अधिकाऱ्यांच्या वेळेनुसारच अधिकारी, ग्राहक व ग्रामस्थांची एकत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु अधिकारीच उपस्थित नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामस्थांनी उपकार्यकारी अभियंता एस. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता गुरुवार 9 रोजी सकाळी 11 वाजता आपण उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना वीज महावितरणची ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याचे सांगत उपस्थित ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.
पाडलोस ग्रामपंचायत जवळ सुमारे 30 ते 40 वीज ग्राहकांनी उपस्थिती दर्शविली होती. काही ग्राहक वाट बघून माघारी परतल्याचे पाडलोस तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी सांगितले. यावेळी आरोस सोसायटी संचालक बाबल परब तसेच ग्रामस्थ आनंद गावडे, सतीश पेडणेकर, विश्वंभर नाईक, देऊ गावडे, विजय(भाई) गावडे, बाळा नाईक, हरी गावडे, गौरेश पटेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
