⚡कुडाळ ता.०७-: कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी गावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन गावडे यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सचिन गावडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, सचिन यांच्या वाढदिवसाला येण्याचा योगायोग आला. आपल्या प्रिय मित्राचा वाढदिवस आणि त्यानिमित्त वेगळा संयोग असतो. सचिन यांच्या कार्याला माझा सलाम आहे. निस्पृह वृत्तीने काम करणारा शिवसैनिक, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणजे सचिन गावडे होय. सचिन या गावाचे भूषण असून आमचेही भूषण आहेत, असे गौरवोद्गार खासदार विनायक राऊत यांनी काढले. आज सचिन यांच्या वाढदिवसानिमित्त गावातील नागरिकांचा सन्मान सोहळा ठेवण्यात आला आहे ही एक कौतुकास्पद बाब असून यासाठी मोठे मन विचार लागतात. ते सचिन गावडे यांच्याकडे आहेत, असेही खासदार विनायक राऊत म्हणाले.
यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय केशकर्तनालय स्पर्धेत अव्वल आलेल्या मेकअप आर्टिस्ट पूजा यशवंत परब आणि राज्यात पहिला आलेल्या बेस्ट फीमेल आर्टिस्ट आकाश परब तसेच गावातील शिक्षक वृंद यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी खासदार विनायक राऊत यांनी सचिन गावडे यांना केक भरून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दशावतारी नाटकाची मेजवानी सुद्धा उपस्थित नागरिकांना देण्यात आली.
माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन गावडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा…
