परतीच्या पावसाने भातशेती धोक्यात
⚡कुडाळ ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मागील चार दिवसांपासून संध्याकाळी ४ च्या सुमारास गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेती केली जाते. मात्र, या परतीच्या पावसामुळे भातपीक आडवे झाले आहे. शेतात पाणी घुसल्यामुळे भात पिकाला कोंब आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान…
