आंबोली-फणसवाडी येथे बीएसएनएल टॉवर मंजूर…

सरपंच सावित्री पालेकर:केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ग्रामपंचायत आंबोलीच्यावतीने अभिनंदन ..

आंबोली ता.११ : आंबोली गावासाठी फणसवाडी येथे बीएसएनएल टॉवर मंजूर केल्याबाबत केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांचे ग्रामपंचायत आंबोलीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तसा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.


आंबोली फणसवाडी भागात त्याच प्रमाणे आंबोली मुळवंदवाडी व गेळे गाव परिसरातील काही भागात या टॉवर चा फायदा येथील ग्रामस्थांना होईल. गेली बरीच वर्षे या भागातील शेतकरी व ग्रामस्थ यांची मागणी केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांच्या माध्यमातून पूर्णत्वास आली याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले, अशी माहित आंबोली सरपंच सावित्री पालेकर यांनी दिली

You cannot copy content of this page