‘गाबीत समाज आणि फागगीते’ पुस्तकाचे १४ रोजी प्रकाशन…

⚡मालवण ता.११-: डॉ. अंकुश सारंग आणि डॉ. उज्वला सामंत लिखित गाबीत समाज आणि फाग गीते या पुस्तकाचे प्रकाशन दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या नरहरी प्रभू झाट्ये सभागृहामध्ये होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. विनोद कुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमास कृ. सी. देसाई शिक्षण मंडळचे कार्याध्यक्ष श्रीपाद पंतवालावालकर, सचिव चंद्रशेखर कुशे, बॅ. नाथ सेवांगण, मालवणच्या समुपदेशक चारुशीला देऊलकर आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. अंकुश सारंग व डॉ. उज्वला सामंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page