सौ. अनुष्का कदम यांना कर्तव्य योगिनी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान…

⚡मालवण ता.११-: ह्यूमन राईट्स प्रेस पब्लिकेशन आणि माझा सिंधुदुर्ग यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरीबद्दल दिला जाणता कर्तव्य योगिनी आदर्श शिक्षिका पुरस्कार माध्यमिक विद्यालय बिळवस या प्रशालेच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का नागेश कदम यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

जागतिक मानवी हक्क दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट्स प्रेस पब्लिकेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार सोहळा कुडाळ येथे संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर अभिनेते विश्वजित फडते, अभिनेत्री राजश्री काळे, कार्यक्रमाचे उदघाटक श्री. देव, संमेलनाध्यक्ष ऍड. महेश कुंटे, निवड समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण खरात आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात माध्यमिक विद्यालय बिळवसच्या उपक्रमशील शिक्षिका सौ. अनुष्का कदम यांना शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल कर्तव्य योगिनी आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनुष्का कदम यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सौ. कदम यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव, सचिव अशोक पालव, सर्व कार्यकारिणी, मुख्याध्यापक जयवंत ठाकूर, सर्व शिक्षक वृंद आदींनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page