ठाकरे सेने कडून बांदा आगार व्यवस्थापकाला धडक…

अनेक समस्यांबाबत विचाराला जाब:लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचे शेवाळे यांचे आश्वासन..

⚡बांदा ता.११-: दररोज २५० बस फेऱ्यानमधून हजारो प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या बांदा बसस्थानकात अनेक समस्या असून अस्वच्छता व पिण्याची पाण्याची कमतरता यामुळे प्रवाशांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी अनोळखी इसमाने विहिरीत आत्महत्या केल्याने पाणी दूषित झाले आहे. स्थानकातील या समस्याचा जाब विचारण्यासाठी शिवसेना (ठाकरे गटाचे) अल्पसंख्यांक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली आज धडक देण्यात आली.

सावंतवाडी आगार व्यवस्थापक विशाल शेवाळे यांनी कडक शब्दात जाब विचारत २० डिसेंबर पर्यंत सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेळ देण्यात आला.

बांदा बस स्थानक आवारातील विहिरात २ दिवसांपूर्वी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. विहिरीचे पाणी दूषित झाल्याने येणाऱ्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली. बसस्थानक परिसरात देखील झाडी झुडपाची वाढ झाली असून अस्वच्छता पसरली आहे. यामुळे खान यांनी स्थानकात धडक देत स्थानक प्रमुख प्रकाश नार्वेकर यांना घेरावो घालत जाब विचारला. नार्वेकर यांनी आपण विहिरीची साफसफाई करण्यासाठी तसेच स्वछता करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याची माहिती दिली. मात्र याबाबत कार्यवाही करण्यात न आल्याने खान संतप्त झालेत. त्यांनी तात्काळ सावंतवाडी आगार प्रमुख विशाल शेवाळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
येथील समस्यानबाबत त्यांनी शेवाळे यांना धारेवर धरले. प्रवाशांना पिण्यासाठी आज टँकर मधून पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन शेवाळे यांनी दिले. येथील समस्यांचे २० डिसेंबर पर्यंत निराकरण न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा खान यांनी दिला. त्यावेळी लवकरात लवकर समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन शेवाळे यांनी दिले.
यावेळी दत्ताराम बांदेकर, तन्मय आईर, सागर धोत्रे, राजा खान, श्रीकांत धोत्रे, कौस्तुभ गावडे, कल्पेश नाईक, ओंकार देसाई, सिद्धार्थ मांजरेकर, श्रेयस आईर, राहुल माने, लक्ष्मण पेडणेकर, श्रीकांत गवस, साहिल खोबरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page