अच्चुत सावंत भोसले यांची माहीती ; २० डिसेबरला संस्थेत दिवसभर कार्यक्रम..
सावंतवाडी
प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर हे २० डिसेंबरला सावंतवाडीत येत असून त्यांचे यशवंतराव भोसले नॉलेज सिटी येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दिवसभर भरगच्च कार्यक्रम होणार आहेत याबाबतची माहीती संस्थेचे अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी दिली.
सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे कार्यक्रम होणार असून सकाळी साडेदहा ते दुपारी बारा यावेळी त्यांची प्रकट मुलाखत होणार आहे. दुपारनंतर बीकेसीचे विद्यार्थी तसेच बाहेरील शाळांमधील विद्यार्थी यांच्याशी वैज्ञानिक हितगुज होणार आहे. यावेळी विद्यार्थी माशेलकर यांना प्रश्न विचारणार आहेत. सायंकाळी जिल्ह्यातील महनीय व्यक्ति पत्रकार शिक्षक सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी यांच्यासोबत ते चर्चा करणार आहेत.
