अटल विश्वकर्माच्या लाभार्थ्यांना अर्चना फाऊंडेशनकडून किटचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.११-: अर्चना फाऊंडेशनच्या वतीने अटल विश्वकर्मा सन्मान योजनेसह विविध २८ योजनांच्या अंतर्गत नागरिकांसाठी विशेष नोंदणी अभियान राबवण्यात आले होते. या अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळून अनेक नागरिकांनी नावनोंदणी केली होती. यातील पात्र लाभार्थ्यांना आज लाभाचे वाटप करण्यात आले. दाभोली येथे पात्र शेतकरी व कामगारांना या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व लाभार्थ्यांनी सौ. अर्चना घारे परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

“हे आशीर्वाद माझ्यासाठी लाखमोलाचे असून माझ्या हातून हे सेवाकार्य अखंड घडावे हीच मनोकामना” अशी भावना यावेळी सौ. अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष संजीव लिंगवत, वेंगुर्ला शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, बबन पडवळ, कृषी सेल तालुकाध्यक्ष बाबा टेमकर, कुणाल बिडये विश्राम कोचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page