Headlines

रयत शिक्षण संस्थेच्या सांगलीच्या सहाय्यक विभागीय अधिकारी पदी अँथोनी डिसोझा यांची निवड…

तुळस हायस्कूल मुख्याध्यापक पदी आहेत कार्यरत:जिल्ह्यात होत आहे अभिनंदन.. वेंगुर्ले (वार्ताहर)-आशिया खंडात अग्रगण्य ४२ सिनीअर कॉलेजेस , ४५३ माध्यमिक उच्चमाध्यमिक शाळा,०७ डि.एड कॉलेज,६७ प्राथमिक शाळा,५४ इंग्लिश मिडीम व पुर्वप्राथमिक,८३ वसतिगृहे,०७ प्रशासकीय कार्यालये,०८ आश्रमशाळा,०३ ITI, इतर१२ व १ विद्यापिठ अशी एकूण ७३७ युनिट असणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या (१२५ युनिट नियोजन करणाऱ्या)दक्षिण विभाग सांगलीच्या सहाय्यक विभागीय अधिकारी…

Read More

कोंडुरे गावाला स्वतंत्रपणे रास्त धान्य दुकानला परवाना द्या…

हेमंत मराठे:महसूलकडे केली निवेदनद्वारे मागणी.. सावंतवाडी -ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कार्यक्षेत्रातील कोंडुरे या महसुली गावाला स्वतंत्रपणे रास्त धान्य दुकान परवाना द्यावा अशी मागणी उपसरपंच हेमंत मराठे यांनी महसूलला निवेदन देऊन केली आहे. ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे ही ग्रुप ग्रामपंचायत असून दोन महसुली गाव या ग्रामपंचायतीला जोडलेले आहेत.यापैकी मळेवाड गावामध्ये रास्त धान्य दुकान असून कोंडुरे गावातील रास्त धान्य…

Read More

कणकवली येथे २४ डिसेंबरपासून नाथ पै एकांकिका स्पर्धा….

⚡कणकवली ता.१९-: कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ४६ वी राज्यस्तरीय बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला २४ डिसेंबर पासून संस्थेच्या नाट्यगृहात प्रारंभ होणार आहे. २५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांची ‘पुतळे झाली माणसे’ लेखनः मेधा मराठे,रात्री १०वाजता विद्यामंदिर हायस्कूल, कणकवलीची ‘आऊट ऑफ…

Read More

मल्लखांब स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूल या प्रशालेचे उत्तुंग यश…

⚡सावंतवाडी ता.१९-: नुकत्याच कोल्हापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत कु. श्रुतिका नारायण परब या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविला .व कु. सुशोभन संदिप सावंत या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचेही अभिनंदन करण्यात आले.यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ….

Read More

युवापिढीने व्यक्तिमत्व विकासातून सामाजिक विकास करावा…

सरपंच वेदिका दळवी:शिबिराचे थाटात उद्घाटन.. ⚡कुडाळ ता.१९-: युवापिढीने व्यक्तिमत्व विकासातून सामाजिक विकास करावा, असे प्रतिपादन वेताळ बांबर्डे सरपंच वेदिका दळवी यांनी केले. पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूर तिठा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होत्या. पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय, पणदूर तिठा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग म्हणजेच एनएसएसचे संस्कार शिबिर वेताळ…

Read More

मिनी पर्ससीनद्वारे माच्छिमारी करणाऱ्या गस्ती नौकेवर मालवणात मत्स्य विभागाची कारवाई…

मालवण ता.१८-: तळाशीलच्या समुद्रात मिनी पर्ससीनद्वारे माच्छिमारी करण्याच्या उद्देशाने जाणाऱ्या गंगाराम कृष्णा पाटील यांच्या हेरंब १ या नौकेवर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मत्स्य व्यवसाय विभागाने धडक कारवाई करीत ती नौका जप्त केली. जप्त करण्यात आलेली मिनी पर्ससीन नौका मालवण बंदरात उभी करून ठेवण्यात आली असून या नौकेवर सागरी कायद्या अन्वये उद्या कारवाई करण्यात येणार…

Read More

आचरा शिवसेना विभाग प्रमुख पदी चंद्रकांत गोलतकर…

⚡मालवण ता.१८-: शिवसेना आचरा विभाग प्रमुख पदी पळसंब माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर यांची निवड करण्यात आली आहे.जिल्हाप्रमुख संजय आंग्रे व तालुका प्रमुख महेश राणे यांनी ही निवड सोमवारी जाहीर केली. चंद्रकांत गोलतकर यांनी शनिवारी उबाठा सेनेतून भैय्या सामंत यांच्या उपस्थितीत सेनेत प्रवेश केला होता. गोलतकर यांना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांच्या सहीने मिळालेल्या नियुक्ती पत्रात…

Read More

मालवण येथील जिल्हास्तरीय बीच हॉलीबॉल स्पर्धेत सावंतवाडी स्पायकर्स संघ विजेता…

⚡मालवण ता.१८-: मालवण नगरपालिका, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रोटरी क्लब पुरस्कृत जिल्हास्तरीय पहिल्या बीच हॉलीबॉल स्पर्धेत सावंतवाडी स्पायकर्स संघाने विजेतेपद पटकावले. युनायटेड भेडशी संघाला उपविजेतेपद मिळाले. सागरी जलतरण स्पर्धेच्या निमित्ताने चिवला बीच येथे प्रथमच जिल्हास्तरीय बीच हॉलीबॉल स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते….

Read More

कोकण चित्रपट महोत्सवात अनेकांचा सन्मान…

रंगली विविध चित्रपटांची चर्चासिंधूरत्न कलावंत मंच, मालवण नगर पालिकेने केले होते आयोजन.. मालवण दि प्रतिनिधीसिंधुरत्न कलावंत मंच यांच्यावतीने व मालवण नगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला दुसऱ्या कोकण चित्रपट महोत्सव २०२३ मध्ये कोकणरत्न पुरस्काराने अभिजीत चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, दिगंबर नाईक, संतोष पवार, प्रभाकर मोरे यांना सन्मानित करण्यात आले असून कोकणची शान हा पुरस्कार देऊन लिना नांदगावकर…

Read More

विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्तीने राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवावी…

कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांचे प्रतिपादन.. मालवण दि प्रतिनिधीविध्यार्थ्यांनी आपल्या अंगी खिलाडू वृत्ती बाणविताना राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवण्यासाठी कष्ट करावे व राष्ट्रीय पातळीवर जाऊन आपल्या जिल्ह्याचे व राज्याचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंत वालावलकर यांनी येथे बोलताना केले मुंबई विद्यापीठ अंतर्गत अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा…

Read More
You cannot copy content of this page