Headlines

मल्लखांब स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूल या प्रशालेचे उत्तुंग यश…

⚡सावंतवाडी ता.१९-: नुकत्याच कोल्हापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धेत कु. श्रुतिका नारायण परब या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक मिळविला .व कु. सुशोभन संदिप सावंत या विद्यार्थ्याने द्वितीय क्रमांक मिळविला.


या विद्यार्थ्यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रीचर्ड सालदान्हा यांनी सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडा शिक्षिका शेरॉन अल्फान्सो यांचेही अभिनंदन करण्यात आले.यावेळी प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page