मालवण येथील जिल्हास्तरीय बीच हॉलीबॉल स्पर्धेत सावंतवाडी स्पायकर्स संघ विजेता…

⚡मालवण ता.१८-: मालवण नगरपालिका, सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना, चिवला किनारा जलक्रीडा पर्यटन सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रोटरी क्लब पुरस्कृत जिल्हास्तरीय पहिल्या बीच हॉलीबॉल स्पर्धेत सावंतवाडी स्पायकर्स संघाने विजेतेपद पटकावले. युनायटेड भेडशी संघाला उपविजेतेपद मिळाले.

सागरी जलतरण स्पर्धेच्या निमित्ताने चिवला बीच येथे प्रथमच जिल्हास्तरीय बीच हॉलीबॉल स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप परब, जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर, रोटरी क्लबचे अध्यक्ष अभय कदम, विक्रांत नाईक, निखिल नाईक, लब्दे, स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत सावंतवाडी स्पायकर्स संघाने विजेतेपट पटकावले तर युनायटेड भेडशी संघाला उपविजेतेपद मिळाले. स्पर्धेत अरबाज शेख सावंतवाडी, नहीम खेडेकर दोडामार्ग यांनी उत्तम खेळाचे दर्शन घडविले.

पंच म्हणून अजित जगदाळे, अमित हर्डीकर, श्री. घोरपडे, इर्शाद शेख यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जॉनी फर्नांडिस व सहकाऱ्यांनी मेहनत घेतली.

You cannot copy content of this page