विद्यार्थ्यांनी खिलाडू वृत्तीने राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवावी…

कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर यांचे प्रतिपादन..

मालवण दि प्रतिनिधी
विध्यार्थ्यांनी आपल्या अंगी खिलाडू वृत्ती बाणविताना राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमक दाखवण्यासाठी कष्ट करावे व राष्ट्रीय पातळीवर जाऊन आपल्या जिल्ह्याचे व राज्याचे नाव मोठे करावे असे प्रतिपादन कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंत वालावलकर यांनी येथे बोलताना केले

मुंबई विद्यापीठ अंतर्गत अंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धा झोन क्रमांक चार चे आयोजन स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण जिमखाना विभागाअंतर्गत करण्यात आले आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंत वालावलकर, सचिव चंद्रशेखर कुशे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, संस्था सदस्य डॉक्टर शशिकांत झाटये, विजय केनवडेकर, संदेश कोयंडे, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष सुधीर धुरी, सदस्य लक्ष्मीकांत खोबरेकर, कोकण झोन क्रीडा समिती सचिव चंद्रकांत नाईक, जिमखाना प्रमुख डॉ. हंबीरराव चौगुले, महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सुमेधा नाईक डॉ. उज्वला सामंत, शंकर खोबरे, प्रा. संकेत बेळेकर, प्रा. के.के राबते प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. संग्राम सिंह पवार, प्रा. धामापूरकर, माजी विध्यार्थी प्रतिनिधी आणि पत्रकार ओंकार यादव तसेच महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी संपूर्ण स्पर्धेचा आढावा मांडला याप्रसंगी संस्था सदस्य श्री. केनवडेकर, श्री. चंद्रकांत कुशे लक्ष्मीकांत खोबरेकर , डॉ. शशिकांत झाटये यांनीही मार्गदर्शन केले.

शेवटी डॉ. सुमेधा नाईक यांनी आभार मानले तर प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिमखाना प्रमुख डॉ. हंबीरराव चौगुले यांनी केले.

You cannot copy content of this page