साळेल येथे श्रम संस्कार शिबिराचे आयोजन…

स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे आयोजन…

मालवण दि प्रतिनिधी

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरुवार दिनांक ४ जानेवारी ते बुधवार दिनांक १० जानेवारी २०२४ या कालावधीत साळेल मालवण येथे सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

‘युवकांचा ध्यास: ग्राम शहर विकास’ हे उद्दिष्ट समोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या शुभहस्ते व साळेल ग्रामपंचायत सरपंच श्री. रविंद्र सहदेव साळकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या उद्घाटन प्रसंगी कॉलेज विकास समिती चेअरमन ॲड. समीर गवाणकर, उपसरपंच श्री. लक्ष्मण भानू परब, पंचायत समिती मालवण माजी सदस्य श्री. कमलाकर गावडे, साळेल ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ, प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर तसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.

शिबिराच्या कालावधीत दररोज दुपारी तीन ते पाच या वेळेत विविध विषयावर लोकशिक्षण आणि बौद्धिक चर्चासत्र होणार आहेत. यामध्ये शुक्रवार दिनांक ५ जानेवारी रोजी ‘ताण तणाव व आरोग्य’ या विषयावर श्री. संजय अंकुश गोसावी, शनिवार दिनांक ६ जानेवारी रोजी ‘ग्राहक साक्षरता काळाची गरज’ या विषयावर प्रा. श्री. एस. एन. पाटील, रविवार दिनांक ७ जानेवारी रोजी ‘मुलींसाठी स्वसंरक्षण’ या विषयावर श्री. वैभव वंळजू, सोमवार दिनांक ८ जानेवारी रोजी’ राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रस्ताव तयारी’ या विषयावर श्री. वसीम सय्यद व मंगळवार दिनांक ९ जानेवारी रोजी ‘आपत्ती व्यवस्थापन’ या विषयावर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना यांच्या सहकार्याने श्री. प्रवीण सुलोकार यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराचा समारोप बुधवार दिनांक १० जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सचिव माननीय श्री. गणेश कुशे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
या शिबिराला सर्वांनी भेट देऊन स्वयंसेवकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. एस. पी. खोबरे, प्रा. के. के. राबते आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. ए. ठाकूर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page