तुळस येथे लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान…
सव्वा सातच्या सुमारास घडली घटना:९० वर्षांच्या आजीला सुखरूप.. ⚡वेंगुर्ला ता.२८-: तुळस-देऊळवाडी येथे एका घरासहीत पडवीत असलेल्या दुकानांना लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले. घरामध्ये जाग्यावर असलेल्या वयोवृद्ध ९० वर्षांच्या आजीला सुखरूप बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. ही घटना आज सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास घडली. फोटोओळी – तुळस येथील रविद्र पेडणेकर यांच्या घराला आग लागून नुकसान झाले.
