पळसंब येथे मोफत नेत्र तपासणी, रक्त तपासणी शिबिर
पळसंब ग्रामपंचायत चे आयोजन

⚡मालवण ता.२८-: विवेकानंद नेत्रालय कणकवली आणि ग्रामपंचायत पळसंब यांच्या सहकार्याने पूर्ण प्राथमिक शाळा नंबर एक पळसंब येथे शनिवार 30 डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी १.३० या दरम्यान मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या वेळी रक्ताच्या सीबीसी,एचबीए१सी,कल्शिअम,पीसीआर,व महिलांसाठी टीएफटी आदी तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.सदर शिबिर पळसंब ग्रामपंचायत तर्फे आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्वांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन पळसंब सरपंच महेश वरक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page