⚡सावंतवाडी ता.२८-: बँकिंग क्षेत्रात प्रामाणिकपणे कायदे आणि नियमांची चौकट सांभाळून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अविज् पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सहकारी पतसंस्थांसाठी आयोजीत “बँको २०२३” हा मानाचा पुरस्कार
कॅथोलिक अर्बन को.ऑप. क्रेडिट सोसा.लि. सावंतवाडी या संस्थेला जाहीर झाला आहे.
दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी दमन येथे आयोजीत पतसंस्था सहकार परिषद २०२४ मध्ये मान्यवरांच्या हस्ते पुरस्कराचे वितरण होणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्रीम. आनमारी जॉन डिसोजा यांनी दिली. संपूर्ण कोकण विभागातून जिल्हयातील हा मान मिळवणारी ही एकमेव संस्था आहे. राज्यस्तरावर वेगवेगळ्या पतसंस्थाकडून मागविण्यात आलेल्या माहितीच्या आधारे, तज्ञ निवड समितीने केलेल्या मुल्यांकनानुसार संस्थेची पुरस्करासाठी निवड करण्यात आली आहे. सहकार क्षेत्रात कॅथॉलिक पतसंस्था नावाजलेली असून संस्थेच्या गुणवत्तापूर्ण कामामुळे संस्थेला आजवर सहा वेळा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. सलग सहावेळा बँको पुरस्कार मिळवणारी सिंधुदुर्ग जिल्हातील एकमेव कॅथॉलिक पतसंस्था आहे. आपल्या सुलभ कारभारामुळे संस्थेचे आपल्या ग्राहकांशी विश्वासाचे नाते जोडले गेले आहे व पुरस्कार ही संस्थेच्या चांगल्या कामाची पोचपावती आहे. ग्राहकांचे संस्थेवरील प्रेम व विश्वास यामुळे संस्था सतत प्रगतीपथावर राहिली आहे. कॅथॉलीक पतसंस्थेच्या सर्व सभासद ग्राहक, संचालक व सर्व कर्मचा-यांचे मनपुर्वक आभार संस्थेच्या अध्यक्षा श्रीम. आनमारी जॉन डिसोजा यांनी मानले.
