सावंतवाडी शहरात रंगपंचमी उत्सव साजरी…
⚡सावंतवाडी ता.२८-: शिमगोत्सव विविधांगी पद्धतीने साजरा करण्याची प्रथा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. सावंतवाडी शहरात आज पाच दिवसांचा रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला.रंगपंचमी निमित्ताने तरुणाई रस्त्यावर उतरली होती. डीजे, ढोल ताशाच्या तालावर आबालवृद्ध थिरकताना पहायला मिळाले. महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. ठिकठिकाणी युवक-युवतींनी रंगपंचमी साजरी करत रंगपंचमीचा आनंद लुटला. नैसर्गिक रंगांचा वापर अधिक प्रमाणात करण्यात आला….
