⚡मालवण ता.२७-:
मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव दि. ३१ मार्च रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासून चौकचार मांड घुमटी मधील पाषाणाची पूजाअर्चा, नवस बोलणे व फेडणे तसेच रात्री ९ वाजल्यापासून पारंपारिक घुमट वादन, कलावंतीण नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. तर यानिमित्त दि. ३ एप्रिल रोजी रात्री ९ वा. वाडवळचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चौकचार मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
मेढा येथील चौकचार मांडाचा ३१ रोजी वार्षिक उत्सव…
