आंतरराष्ट्रीय वेशभूषा स्पर्धेत सौ.रिना व कु.नैतिक मोरजकर द्वितीय…

बांदा/प्रतिनिधी
शिवसंस्कार या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्य स्पर्धेत जिजाऊ-शिबवा वेशभूषा माता पालक गटात सौ. रीना निलेश मोरजकर व कु. नैतिक निलेश मोरजकर यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. तर ‘माझा आवडता मावळा’ या मोठ्या गटात नैतिक मोरजकर याने आंतरराज्य द्वितीय क्रमांक मिळविला. गेल्या चार दिवसातील आंतरराज्य स्पर्धेतील मोरजकर माय-लेकाचे हे दुसरे यश असून त्यांचे अभिनंदन होत आहे.


शिवसंस्कारच्या वतीने दरवर्षी ऑनलाईन आंतरराज्य स्पर्धा घेण्यात येते. विविध गटात शेकडो स्पर्धक सहभाग घेतात. जिजाऊ शिवबा वेशभूषा माता पालक गटात मोरजकर माय लेकाने द्वितीय क्रमांक मिळविला. तर माझा आवडता मावळा या मोठ्या गटात नैतिक मोरजकर याने मुरारबाजी देशपांडे ही व्यक्तीरेखा साकारली होती. या गटात त्याने द्वितीय क्रमांक मिळविला. चार दिवसांपूर्वी देखील साहिल प्रकाशनच्या वतीने गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या आंतरराज्य कविता सादरीकरण स्पर्धेत खुल्या गटात सौ. रीना मोरजकर यांनी प्रथम तर लहान गटात नैतिक मोरजकर याने द्वितीय क्रमांक मिळविला होता. मोरजकर माय लेकाच्या दुहेरी यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page