मडुरा पंचक्रोशीत शिवजयंती उत्साहात साजरी…

पाडलोस, मडुरामध्ये भव्य मिरवणूक : परिसर व्यापला भगव्या रंगाने.. बांदा ता.१९-: साऊंडद्वारे ढोल, ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन् भगवे ध्वज हातात घेऊन मडुरा पंचक्रोशीत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून सोमवारी पाडलोस, मडुरा, रोणापाल,…

Read More

राष्ट्रवादीच्यावतीने जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केले अभिवादन…

⚡कणकवली ता.१९-: कणकवली येथे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी पुष्पहार अर्पण केला .त्यावेळी शिवाजी चौक मित्रमंडळ अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,आनंद पारकर, चेतन मुंज यांनी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजेंद्र पावसकर,जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,…

Read More

कणकवलीतील युवकाने स्वतःचा रक्ताने रेखाटले छत्रपतींचे चित्र…

394 व्या जयंतीनिमित्त दिली अनोखी मानवंदना… कणकवली ता.१९-: कणकवली तांबेवाडी येथील विक्रांत सावंत या युवकाने आपल्या रक्ताच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त सुंदर असे चित्र रेखाटले असून, हे चित्र काढण्यासाठी त्याला अर्धा तास वेळ लागला. त्यानें काढलेल्या या चित्रांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. खडतर परिस्थितीवर मात करत तो सावंतवाडी येथील बी…

Read More

येणाऱ्या काळात वडेट्टीवार आणि आमचे बॉस एकत्र सागर बंगल्यावर असतील…

आमदार नितेश राणे यांचे सूचक विधान:कोणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळेल.. ⚡कणकवली ता.१९-: राहूल गांधींचे मोहब्बतचे दुकान आता बंद होत नफरतचे दुकान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून देशभरात अनेक प्रवेश होत आहेत.देशात मोदींची गॅरंटी चालते हे दिसून येत आहे.त्यामुळे कोणाला अजून धक्का बसला तर नवल वाटू नये.विजय वडेट्टीवार…

Read More

छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त अभिवादन…

⚡सिंधुदूर्गनगरी ता.१९-: ओरोस येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पमाळ अर्पण करीत अभिवादन केले गेले. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे,पी एम विश्वकर्मा समितीचे सदस्य प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यगीतचे…

Read More

दारिस्ते गावच्या मुख्य रस्त्याचे खास. विनायक राऊत यांनी केले भूमिपूजन…

कणकवली ता.१९-: दारिस्ते गावच्या मुख्य रस्त्याचे भूमिपूजन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर , कणकवली विधानसभा संघटक सचिन सावंत , शिवसेनाकणकवली तालुकाप्रमुखडॉ. प्रथमेश सावंत ,युवासेना जिल्हा समनवयक राजू राठोड,युवासेना कणकवली तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपतालुका प्रमुख हेमंत सावंत, शिवसेना शाखा अध्यक्ष अविनाश गावकर, युवासेना शाखा प्रमुख विजय गावकर , मा….

Read More

आरे येथे ४० दात्यांनी केले रक्तदान…

शिवप्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने उपक्रम.. ⚡कणकवली ता.१९-: आरे येथील शिवप्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंतीच्या निमित्ताने ‘रक्तदान हे श्रेष्ठ दान’ असा संदेश देत ग्रामपंचायत कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात अनेक तरुण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी ४० दात्यांनी रक्तदान केले. रक्तदान केल्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात.ही बाब लक्षात घेऊन सामाजिक जाणिवेतून आरे येथे शिवप्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान…

Read More

स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडीत शिव रॅलीचे आयोजन…

⚡सावंतवाडी, ता.१८-: येथील स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून शिवजयंतीच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे सकाळी १० वाजता शहरात शिव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून महेश पांचाळ यांनी केले आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून येथील राजवाड्यातून रॅलीचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे यावर्षीही रॅली काढण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले

Read More

आंबोलीतील पकडलेल्या शिकारीच्या गुन्ह्यातील आरोपींना तीन दिवसांची वन कोठडी…

⚡सावंतावडी ता.१८-: प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी आज सकाळी इनोव्हा कारसह ताब्यात घेण्यात आलेल्या सहा आरोपींना सावंतवाडी न्यायालयाने तीन दिवसांची वन कोठडी सुनावली. गुन्ह्यात अटक आरोपी फरान समीर राजगुरू (वय २६), नेल्सन इज्माईल फर्नाडिस (वय ४२) दोघे (रा. सालईवाडा-सावंतवाडी), बाबुराव बाळकृष्ण तेली (वय ४२, रा. सावंतवाडी जेलच्या मागे), सर्फराज बाबर खान (वय ३४), रजा गुलजार खान (वय…

Read More

युवराज लखमराजे भोसले यांनी मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दिली सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी ता.१८सहदेव राऊळ-: मळगाव येथे शिवजयंतीची जोरदार पूर्वतयारी सुरु असून या पार्श्वभूमीवर सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांनी मळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भिल्लवाडी ग्रुपचे इतर सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. लखमराजे भोसले यांनी समस्त ग्रामस्थांना एकत्रित करत मळगाव…

Read More
You cannot copy content of this page