सावंतवाडीच्या राजघराण्याकडून सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क…

⚡सावंतवाडी ता.०७- : लोकसभा निवडणुक २०२४ मतदानाला सुरूवात झाली असून राज्यातील मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात सकाळी ७ पासूनच मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानास गर्दी केली होती. सावंतवाडीच्या राजघराण्याकडून देखील सहकुटुंब मतदानाचा हक्क बजाविण्यात आला. लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी सर्व नागरिकांना मतदान कराव असं आवाहन यावेळी राजघराण्याकडून करण्यात आलं. याप्रसंगी राजेसाहेब खेमसावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, राजकन्या उर्वशीराजे भोंसले आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page