दिपक केसरकर:अन्यथा विधानसभेत तुमच्या मतदारसंघात याव लागेल…
सावंतवाडी : भाजपनं पैसै वाटले असं म्हणणाऱ्या आमदार वैभव नाईक यांनी त्यांना रोखले का नाही ? माझ्या निवडणूकीत मी कधीही पैसे वाटले नाहीत. उलट असे प्रकार रोखण्याच काम आम्ही केलं आहे. लोक म्हणतात उबाठानेच पैसे वाटले. आ. नाईक यांनी अशाप्रकारे बोलून कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. लाचारी आमच्या रक्तात नाही. कोकणी माणसाच्या स्वाभिमान ललकारू नका, अन्यथा विधानसभेत तुमच्या मतदारसंघात याव लागेल. मागच्यावेळी अर्ज बाद झाला म्हणून वाचला असा सणसणीत इशारा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देत वैभव नाईकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं.
