राजन तेली:नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य सावंतवाडीतून दिलं जाईल..
⚡सावंतवाडी ता.०६-: महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित आहे. विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात आम्ही पोहचलो आहोत. महायुतीसाठी पोषक असं वातावरण असे मत माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे व्यक्त केले.
दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आहे. ‘आमचा मत मोदीक’ अशी भावना ग्रामीण भागात आहे. माजी सैनिक देखील या प्रचारात भेटले. त्यांनी गेल्या दहा वर्षांतील चांगला अनुभव सांगितला. मोदींनी सैनिकांच मनोधैर्य वाढविण्याच काम केल. उद्याची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. यावेळी मतदानाचा टक्का देखील वाढणार आहे. अमित शहा, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आदी नेते प्रचारासाठी इथे आले. पोषक असं वातावरण महायुतीला इथे असल्याच देखील तेली यावेळी बोलताना म्हणाले ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
ते पुढे म्हणाले की मागच्यावेळी भाजप आणि शिवसेना युती होती. परंतू, आता परिस्थिती बदललेली आहे. महायुतीची ताकद मोठी आहे. सहापैकी चार आमदार महायुतीचे आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच वेगळं वलय आहे. नव्वद नंतर विकास करण्याच काम त्यांनी केलं. अंतुलेनंतर कोकणातील नारायण राणे हे मुख्यमंत्री राहीले आहेत. आता ते केंद्रीय मंत्री आहेत. निवडून आल्यावर पुन्हा ते मंत्री होतील असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी मतदारसंघातून गेल्यावेळी युतीच्या उमेदवारांस २७ हजारांच लीड दिल होत. आज महायुतीत आम्ही सगळे एकत्र आहोत. तसेच देशातील आजची परिस्थिती, ५४ योजनांचा लोकांना तळागाळात मिळणारा लाभ पहाता महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य सावंतवाडीतून दिलं जाईल. किमान ५० हजारांच्यावर मताधिक्य मिळेल असा विश्वास तेलीनी व्यक्त केला.याप्रसंगी माजी नगरसेवक आनंद नेवगी उपस्थित होते.
