मराठी माणसाला शिवसेना उबाठाने लुटले…

आमदार नीतेश राणे यांची टीका: मराठी माणसाच संरक्षण करण्याची ताकद आमच्यात आहे…

⚡कणकवली ता.०६-: मराठी माणसावर बोलण्याचा अधिकार संजय राऊतांला नाही. मराठी माणसावरील अन्याय कोण सहन करणार नाही. उबाठाने मराठी माणसाला लुटला आहे. मात्र, मराठी माणसाच संरक्षण करण्याची ताकद आमच्यात आहे. मराठी माणसाने नोकरी करावी, वडापाव खाऊन राहावे आणि राऊतांच्या मुलीने वाइनची कंपनी उघडावी. हे योग्य आहे का? असा सवाल करतानाच शिवसेना, भाजपवर टीका करताना भाषा सांभाळून वापरावी. भाषेची स्पर्धा लागली तर तुम्ही दिसणार नाही. तुम्हाला शरद पवारांची एडटोळी बोलायचे का? असा रोख ठोक सवाल भाजप प्रवक्ते तथा आमदार नीतेश राणे यांनी केला.

You cannot copy content of this page