आम. वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत बजावला मतदानाचा हक्क…

⚡कणकवली ता.०७-: शहरातील शिवाजीनगर येथील जि. प. शाळा नंबर 5 येथील मतदान केंद्रावर कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वैभव नाईक यांच्या आई सुषमा नाईक, पत्नी स्नेहा नाईक, मुलगी नंदिनी नाईक, भाऊ सतीश नाईक, सुशांत नाईक, संकेत नाईक, सेजल नाईक, मयुरी नाईक यांनी मतदान केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून मविआचे उमेदवार तथा खा. विनायक राऊत हे मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील, असा विश्‍वास वैभव नाईक यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page