वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी घेतली मंत्री दिपक केसरकर यांची भेट…
विकास कामांवर केली चर्चा; ⚡सावंतवाडी ता.०४-: वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी नुकतेच शिंदे गटात प्रवेश केल्याने प्रथमच त्यांनी आज मंत्री दीपक केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. गावडे यांनी यावेळी गावातील विकास कामांबाबत तसेच संघटना वाढीव बाबत चर्चा केली. यावेळी योगेश नाईक प्रसाद नाईक श्रीपाद राणें आदी उपस्थित होते.
