⚡कणकवली ता.१९- : गुरूवारी झालेल्या वादळात हरकुळ बुद्रुक येथील सुमारे 52 घरांचे नुकसान झाले. ऐन पावसाळ्यााया तोंडावर नुकसान झालेल्या या नुकसानग्रस्तांना उबाठा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पत्रे, कौलांचे वाटप करण्यात आले.
हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथे झालेल्या या वाटपावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, सरपंच आनंद ठाकूर, उपसरपंच नित्यानंद चिंदरकर, सर्फराज शेख, रफिक शेख, सलाम शेख, कबरेश शेख, अब्दुल समद शेख, आझाद शेख, आब्बास शेख व इतर उपस्थित होते.
गुरूवारी झालेले वादळ हे हवामानखात्याने कोणत्याही प्रकाराची पूर्व कल्पना न देता झालेले होते. या वादळात तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने या सर्वांना तातडीने तौक्ते वादळाच्या भरपाईनुसार जास्तीची भरपाई देण्याची आम्ही मागणी केली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी आमची मागणी आहे. दि. 24 मे पर्यंत कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सतीश सावंत यांनी दिला.
ठाकरे शिवसेनेकडून नुकसानग्रस्तांना मदत…
