विविध प्रश्नांबाबत उद्या अधिकाऱ्यांची भेट घेणार…

ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती..

⚡कणकवली ता.१९-: तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने झालेले मोठ्या प्रमाणातील नुकसान, महामार्गावर होणारे प्राणघातक अपघात, मारहाणीाया घटना घडूनही पोलीस कारवाईला होणारा विलंब, तालुक्यातील पाणीटंचाई, खंडीत विजपुरवठा, धरण प्रकल्प, महावितरणकडून ट्री कटींगबाबत न होणारी कार्यवाही आदीच्या अनुषंगाने शिवसेनेच्यावतीने प्रांताधिकारी, तहसीलदार यांची सोमवारी 20 मे रोजी सकाळी 10 वा. भेट घेण्यात येणार आहे. यावेळी पोलीस, महावितरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, गटविकास अधिकारी आदी संबंधीत सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवावे, अशी मागणी प्रांताधिकारी व तहसीलदारांकडे करण्यात आली असून यावेळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, धरणग्रस्त शेतकरी, आपद्ग्रस्त व मविआाया सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी केले आहे.
तालुक्यात दोन दिवसांपुर्वी झालेल्या वादळी पावसात अनेक गावामंध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून जरी पंचनामे करण्यात आलेले असले तरीही या सर्व आपद्ग्रस्तांना तातडीने मदत मिळण्याची गरज आहे. दि. 24 मे पर्यंत मदत न मिळाल्यास आम्ही आंदोलन छेडण्याचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने सकारात्मक कार्यवाही करून पावसाळ्याच्या पूर्वसंधेला झालेल्या या नैसर्गिक आपत्तीसाठी विशेष बाब म्हणुन मदत देण्याची आमची मागणी आहे, असेही श्री. पारकर यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page