विजेच्या खेळखंडोबामुळे हळवलवासीय हैराण…

⚡कणकवली ता.१९-: हळवल गावात सायंकाळी वीज गायब होण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे ग्राहक हैराण झाले आहेत. ग्रामस्थांनी महवितरणाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता ट्रायल टेस्ट सुरु असल्याचे कारण दिले जाते.


दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका हळवल गावाला बसला होता. पावसामुळे 4 विद्युत पोल पडले होते. याशिवाय विद्युत तारांवर झाडांच्या फाद्या पडल्या होत्या. परिणामी गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर महावितरणकडून खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. अवकाळीपावसानंतर हळवल गावात सायंकाळच्या सत्रात वीज गायब होण्याचा प्रकार वारंवार होत आहे. विजेअभावी ग्राहक हैराण झाले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, तात्पुरती दुास्तीनंतरही हे प्रकार वारंवार होत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page