कळसुलीतील स्वामी समर्थ मठाचा वर्धापन दिन उत्साहात…

⚡कणकवली ता.१८-: प्रेमदया प्रतिष्ठान आणि श्री स्वामी समर्थ मठ, कळसुली यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली-हर्डी येथे श्री स्वामी समर्थ मठाचा प्रथम वर्धापन दिन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त स्वामी समर्थांची पालखी मिरवणूक कढण्यात आली.
पालखी मिरवणुकीत आणि दिंडीत प्रेमदया प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत सावंत, उपाध्यक्षा हर्षाली सावंत, ट्रस्टी संतोष सावंत, किरण सावंत, किशोर घाडीगावकर, दिलीप सावंत यांच्यासह वारकरी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या सोहळ्यानिमित्त दिवसभर मठात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. दुपारच्या सत्रात भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. सायंकाळच्या सत्रात भजने, कीर्तने, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांनी मठात गर्दी केली होती. श्री स्वामी समर्थ मठात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

You cannot copy content of this page