मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायत प्रशासन ‘अलर्ट’…

⚡कणकवली ता.१९-: मान्सूनच्या पार्श्‍वभूमीवर कणकवली नगरपंचायत प्रशासन ‘अलर्ट’ झाले आहे. शहरात गटारे, ओहोळ, नाले सफाईााी कामे युद्धपातळीवर सुरु आहेत. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या, शहरातील वीजपोल, वाहिन्या आदींची पाहणी करण्यात येत आहे. लवकरच डास प्रतिबंधक औषध फवारणी करण्यात येणार असून नगरपंचायतीमध्ये आपत्ती व्यवस्थापन कक्षही स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती प्रभारी मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी दिली आहे.


कंकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, प्लॅस्टीक व कचरा साचल्याने किरकोळ पावसातही ओहोळ, गटारांचे पाणी रस्त्यांवर येऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ओहोळ, गटारांमध्ये घाणीचे थर साचल्याने डासांचा प्रादुर्भाव होतो. त्याच अनुषंगाने गटार, ओहोळ साफसफाईाो काम हाती घेण्यात आले आहे. शहरातील दळवी वकील शेजारील, हर्णेआळी, तेलीआळी, उबाळे मेडिकल, सिद्धार्थनगर, नगरपंचायत रस्ता, मसुरकर किनई या भागातील गटारे व ओहोळ साफसफाईचे काम पूर्ण झालेले आहे. उर्वरीत गटारे, ओहोळ साफसफाई काम लवकराा पूर्णत्वास जाईल.
शहरातील धोकादायक स्थितीमधील इमारतींबाबत संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधितांनी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावयाची असून कार्यवाही केल्याबाबतची माहिती न. पं. ला द्यावयाची आहे. अन्यथा वित्तिय, जीवितहानी झाल्यास नगरपंचायत जबाबदार राहणार नाही. शहरातील रहदारीच्या ठिकाणी, रस्त्यांलगत सार्वजनिक किंवा वैयक्तिक जागेमध्ये असणारी धोकादायक झाडे संबंधितांनी या कार्यालयाची रितसर परवानगी घेऊन तोडून घ्यायची आहेत. अन्यथा जिवित, वित्तहानी झाल्यास जागा, झाडमालक जबाबदार राहतील, असेही कंकाळ यांनी म्हटले आहे.
वीजपोल, वाहिन्यांची पाहणी करून सुस्थितीत असल्याबाबतची खात्री करण्यासाठी, वीज पोलासमोरील वाढलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याबाबत वीज वितरण कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे उन्मळून पडलेल्या वृक्षांचे तोडकाम करण्यासाठी वुडकटर मशीन व इतर साहित्य तयार ठेवण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. पुरस्थिती नियंत्रणाकरीता आपत्कालीन कर्मचाऱ्यांसह जेसीबी, ट्रक्टर व इतर अनुषंगिक साहित्यही तयर ठेवण्यााया सूचना संबंधित न. पं. च्या विभागाला देण्यात आल्या आहेत.
साथरोग नियंत्रणासाठी भंगारवाले, नवीन बांधकाम चालू असलेले बांधकाम व्यवसायिक व इतर राज्यातून आलेले कामगार यांना सूचनांचे पत्र देण्याबाबत, आरोग्य तपासणी करण्याबाबत कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साचलेल्या पाण्यात डास उत्पत्ती होऊ नये म्हणून अ‍ॅबीटींग व डास फवारणी करण्यात येणार आहे. सार्वजिक विहिरींमध्ये टाकण्यासाठी, नळ पाणीपुरवठा शुध्दीकरणाकरीता टी.सी.एल.चा साठा करून ठेवणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापनाबाबत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याच्याही सूचना करण्यात आल्याचे कंकाळ यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page