हरकुळ बु. येथे 23 मे रोजी संयुक्त जयंती महोत्सव…

⚡कणकवली ता.१९-: डॉ. बाबासाहेब आंबेडकर विकास मंच हरकुळ बुद्रक-बौद्धवाडी यांच्यावतीने तथागत भगवान गौतमबुद्ध, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव बौद्धवाडी येथे गुरुवार 23 मे रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.


या महोत्सवानिमित्त सकाळी 10 वा. पंचशील ध्वजवंदन, 10.30 वा. बुद्ध पूजापाठ, सायंकाळी 4 वा. फनीगेम्स, रात्री 8 वा. अभिवादन सभा, 9 वा. खुली एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धा होईल. या कार्यक्रमांना सरपंच आनंद उर्फ बंडू ठाकूर, उपसरपंच आयुशा पटेल, पोलीस पाटील संतोष तांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर विकास मंचातर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, रेकॉर्ड डान्स स्पर्धेत ज्या स्पर्धकांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी लक्ष्मीदत्त कॉम्प्लेक्स येथील सचिन तांबे, संदीप तांबे यांच्याकडे संपर्क साधावा.

You cannot copy content of this page