Headlines

मंगळूरू एक्स्प्रेसच्या नव्या थांब्याचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत…

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मंजूर झालेल्या मंगळूरू एक्स्प्रेसच्या थांब्यानंतर आज सकाळी प्रथमच ही गाडी स्थानकात दाखल झाली. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच तालुक्यातील नागरिकांनी गाडीचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ वण पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रेल्वेला मिळालेल्या या नव्या थांब्यामुळे सावंतवाडीसह सिंधुदुर्ग…

Read More

दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगावातील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप…

⚡सावंतवाडी, ता.२७-: महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. यावेळी माजगाव येथील जिल्हा परिषद शाळा क्र. ६ (कुंभारवाडा) तसेच गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा…

Read More

दोडामार्ग–विजघर रस्ता बनला मृत्यूचा सापळा..

तातडीने दुरुस्ती न झाल्यास रस्ता रोको करु:राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाबू गवस यांचा इशारा.. दोडामार्ग : दोडामार्ग–विजघर रस्त्यावरील काँक्रीटीकरणाचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराच्या बेजबाबदार कारभारामुळे हा रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याची तीव्र नाराजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे दोडामार्ग तालुका अध्यक्ष बाबू गवस यांनी व्यक्त केली आहे. मेढे परिसरात रस्ता खोदून तसाच ठेवण्यात आल्याने…

Read More

​ज्येष्ठ पत्रकार, माजी शिवसेना तालुकाप्रमुख उत्तम वाडकर यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡सावंतवाडी,ता.२६-:ज्येष्ठ पत्रकार, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख तसेच विविध वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी उत्तम उर्फ भास्कर सूर्यकांत वाडकर (७२)यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे पत्रकारिता, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. ​उत्तम वाडकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात पत्रकारितेतून केली. सामाजिक भान जपून त्यांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना नेहमी वाचा फोडली. पत्रकारितेत सक्रिय…

Read More

‘जबाबदार पर्यटनासाठी स्वच्छता आवश्यक’..

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:आंबोलीतील स्वच्छता मोहिमेच उत्साहात शुभारंभ.. सावंतवाडी : ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी आंबोली येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वच्छतेच्या या वारीमध्ये सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सहभाग घेतला. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासाठी स्वच्छता महत्त्वाची असून जबाबदार पर्यटन असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी केले केले….

Read More

देशसेवेनंतर समाजसेवेतही माजी सैनिकांचे योगदान मोलाचे…

युवराज लखमराजे भोसले:वीर जवान व त्यांच्या कुटुंबीयांचा गौरव.. सावंतवाडी : प्रत्येकाने देश व राष्ट्रप्रेम जागृत ठेवून कार्यरत राहिले पाहिजे. सैनिक म्हणून देशसेवा आणि देशाचे संरक्षण केल्यानंतरही माजी सैनिक समाजसेवा करत असल्याने ते खऱ्या अर्थाने सैनिकच आहेत. भावी पिढीत जाज्वल्य देशाभिमान जागृत ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यास माजी सैनिकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन युवराज लखमराजे भोसले यांनी केले….

Read More

राष्ट्रीय आरोग्य अभियान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मानले पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार

सिंधुदुर्गातील २३० कर्मचाऱ्यांना दिलासा कणकवली : राज्यातील आरोग्य विभागात १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावणाऱ्या १५,०१० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदावर एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाबद्दल राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली येथील…

Read More

कणकवली एस.टी. आगारचा विकास आराखड्यात आशियेकडे जोडणा-या रस्त्याचा समावेश करा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे आशिये सरपंच महेश गुरव यांची मागणी ; सकारात्मक चर्चा कणकवली : कणकवली तालुक्यातील आशिये येथील प्रस्तावित परिवहन महामंडळ कणकवली बसस्थानक विकासकामाला गती देण्यात यावी. तसेच या बसस्थानक व आगार विकसित होत असताना कणकवली ते आशिये जोडणारा मार्ग नियोजित विकास आराखड्यात समाविष्ट करण्याची मागणी मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे…

Read More

आशुतोष (अमित) भांगले व प्रमोद कामत यांना यंदाचा ‘सेवाव्रती पुरस्कार’ जाहीर

बांदा : समाजसेवा, शिक्षण, ग्रामीण विकास आणि विविध लोकोपयोगी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत श्री आशुतोष (अमित) अरविंद भांगले आणि प्रमोद मधुकर कामत यांची रोटरी क्लब ऑफ बांदातर्फे यंदाच्या ‘सेवाव्रती पुरस्कार’ साठी निवड करण्यात आली आहे. दोन्ही मान्यवरांच्या कार्याचा गौरव होत असल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. श्री आशुतोष (अमित) भांगले यांनी सामाजिक,…

Read More

एसआरएम कॉलेज मध्ये ‘भाज्या व फळे सजावट स्पर्धा’

रानफुले छायाचित्र प्रदर्शनाचेही आयोजन कुडाळ : क. म. शि. प्र. मंडळाचे संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथील महिला विकास कक्षाच्या वतीने दि.२३ जुलै रोजी ‘भाज्या व फळे सजावट स्पर्धा’ तसेच ‘रानफुले छायाचित्र प्रदर्शनाचे’ आयोजन करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांना महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.वर्ष २०२६ हे संपूर्ण जगभरात ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून…

Read More
You cannot copy content of this page