Headlines

७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा लाभ घ्यावा…

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे माजगाव येथे आवाहन..

⚡सावंतवाडी ता.०१-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असून यामध्ये ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतीही उत्पन्नाची अट ठेवली गेलेली नाही. त्यामुळे सावंतवाडीतील जास्तीत जास्त ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा; यासाठी ज्येष्ठ नागरिक संघाने पुढाकार घ्यावा, आवश्यक असणारे सर्व सहकार्य नगरपालिकेकडून केले जाईल, असे आश्वासक प्रतिपादन सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तथा ज्येष्ठ नागरिक समितीचे अध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले.
माजगाव येथे आयोजित ज्येष्ठ नागरिक समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ॲड. निरवडेकर पुढे म्हणाले की, वयाच्या या टप्प्यावर आरोग्यविषयक सुविधा मिळणे हा ज्येष्ठ नागरिकांचा हक्क असून केंद्राच्या आरोग्य योजनेमुळे मोठ्या वैद्यकीय उपचारांचा आर्थिक भार हलका होण्यास मदत होणार आहे.
माजगाव येथील या कार्यक्रमास सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर आणि मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page