⚡सावंतवाडी, ता.०१-: सावंतवाडी तालुका शिवसेना महिला आघाडीच्या आंबोली, माडखोल व कोलगाव या तीन जिल्हा परिषद विभागांसाठी महिला तालुका प्रमुखपदी सौ. सोनाली देविदास परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांनी आज त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.

यावेळी पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सुष्मिता जाधव यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सौ. अर्चना पांगम, सौ. उत्कर्षा गावकर, सौ. प्रणाली टिळवे, सौ. प्रचिती कुबल, सौ. चैत्राली गावडे, सौ. निकिता परब, सौ. श्रेया गोवेकर, सौ. सरिता तरफे, सौ. मानसी साताडेकर, सौ. शीतल टोपले, ॲड. सौ. शीतल टिळवे आणि सौ. श्रावणी धुरी उपस्थित होत्या.सोनाली परब यांच्या नियुक्तीमुळे आंबोली, माडखोल व कोलगाव जिल्हा परिषद विभागातील महिला संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळणार असून, पक्षाच्या महिला आघाडीच्या माध्यमातून विविध सामाजिक व संघटनात्मक उपक्रमांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
