पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत ६० उमेदवारांचा सहभाग

कुडाळ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग आणि श्री. पुष्पसेन सावंत फार्मसी महाविद्यालय, कृषी महाविद्यालय व नर्सिंग विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभांतर्गत रोजगार महामेळाव्याचे आयोजन पुष्पसेन ज्ञानपीठ येथे करण्यात आले.
बया मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी राजेंद्र परब, गीता काळे, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भुपतसेन सावंत, परिसर संचालिका नूतन परब, संचालक राम घोगळे, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, सीता ढवळे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवराज पांढरे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग लंगुटे, माई नर्सिंग स्कूलचे प्राचार्य ओंकार गरड तसेच विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी राजेंद्र परब आणि गीता काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या रोजगार महाकुंभाच्या मुख्य उद्घाटन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही उपस्थितांना दाखविण्यात आले.
मेळाव्यात जन आरोग्य प्रा. लि., सीमकेम प्रा. लि., एफएमसी इंडिया प्रा. लि. यांसह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या. या रोजगार महामेळाव्यात एकूण ६० उमेदवारांनी सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका पवार आणि देवांगी यांनी केले.
