Headlines

वाढीव वीज बिल आणि स्मार्ट मीटरविरोधात कवठी ग्रामस्थ आक्रमक

जि.प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट

कुडाळ : वाढीव वीज बिल आणि स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारींसंदर्भात कवठी येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या विविध तक्रारी मांडत सविस्तर चर्चा केली.
स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होत असल्याच्या तक्रारींसह ग्रामस्थांनी आपल्या शंकांचे निरसन करण्याची मागणी केली. यावेळी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन होईपर्यंत गावात स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येऊ नयेत, अशी सूचना रुपेश पावसकर यांनी अधीक्षक अभियंत्यांना केली.
या सूचनेला अधीक्षक अभियंत्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. जनतेच्या हितासाठी आपण कायम संघर्ष करणार असल्याचे रुपेश पावसकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
या भेटीदरम्यान मंगेश बांदेकर, रुपेश वाडयेकर, राजन खोबरेकर, नंदकिशोर वाडयेकर, सुहास खोबरेकर, गोकुळ तोरस्कर यांच्यासह कवठीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page