भाजप जनसंपर्क कार्यालयात सायंकाळी पाच वाजता बैठक: तर साडेपाच वाजता पत्रकार परिषद..

⚡सावंतवाडी ता. ०१-: सावंतवाडी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आणि पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील भाजप जनसंपर्क कार्यालयात ही बैठक होणार आहे.
या बैठकीत नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अचानक तातडीने बैठक आणि त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आल्याने भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
बैठकीत कोणता महत्त्वपूर्ण निर्णय किंवा भूमिका जाहीर केली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
