Headlines

कुडाळ मारुती मंदिर आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर…

आंतरराज्य चक्री वारकरी भजन स्पर्धेत कासार्डेचे ‘धारेश्वर’ प्रथम:जिल्हास्तरीय मध्ये ‘केपादेवी’ वेंगुर्ले तर संगीत मध्ये ‘रामकृष्ण’ पाट प्रथम.. ⚡कुडाळ ता.२६-: आषाढी एकादशीच्या निमित्ताने हरिनाम सप्ताहाचे औचित्य साधून येथील श्री देव मारुती नगर ब्राम्हण देवस्थान कमिटी, बाजारपेठ कुडाळ आयोजित विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये आंतरराज्य दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धा गटात श्री धारेश्वर प्रासादिक…

Read More

मुक्ती की युक्ती ट्रस्टतर्फे आडेली खुंटवळवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.२६-: शिक्षण केवळ ज्ञान देत नाही, तर माणुसकी, समता, संस्कार आणि सामाजिक जबाबदारीची जाणीवही निर्माण करते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उत्तम शिक्षणासोबत चांगल्या मूल्यांचा अंगीकार करून आदर्श नागरिक बनावे असे आवाहन मुक्ती की युक्ती ट्रस्टच्या सदस्या सेजल जी यांनी केले. हरगुरु युगनायक सेठ जी महाराज यांच्या कृपेने मुक्ती की युक्ती ट्रस्टच्यावतीने वेंगुर्ले तालुक्यातील आडेली खुंटवळवाडी येथे…

Read More

अवघा रंग एक झाला… विठूनामात तल्लीन झाले युवा नेते विशाल परब!

आषाढी एकादशी निमित्त वेंगुर्ला तालुक्यात भक्तिमय वातावरण वेंगुर्लाआषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण वातावरण विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेले असताना, भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते तथा उद्योजक विशाल परब हेही भक्तिरसात पूर्णपणे रंगून गेल्याचे भावस्पर्शी चित्र पाहायला मिळाले. “अवघा रंग एक झाला…” या संतवचनाची जणू प्रत्यक्ष अनुभूती देत विशाल परब यांनी विठ्ठल नामाचा अखंड जप करत…

Read More

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळातर्फे भव्य गुणवंत विद्यार्थी सन्मान

वेंगुर्लाभंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित “भंडारी गौरव सोहळा व गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभ – २०२६” उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. साई दरबार हॉल, वेंगुर्ला येथे झालेल्या या कार्यक्रमात भंडारी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला.तसेच इ. ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत…

Read More

भंडारी प्राथमिक शाळेच्या मुलांनी काढली वारकरी दिंडी…

⚡मालवण ता.२५-:जय जय विठ्ठल… जय हरी विठ्ठल असा विठुरायाचा जयघोष करत आणि विठ्ठल रुक्मिणी व वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशभूषा करीत मालवण मधील भंडारी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यानी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी दिंडी काढली. लहान मुलांनी काढलेली ही दिंडी सर्वांचे आकर्षण ठरली. भंडारी प्राथमिक शाळेत काढलेल्या वारकरी दिंडी मध्ये विठ्ठल, रुक्मिणी आणि वारकऱ्यांची आकर्षक वेशभूषा…

Read More

‘शिवाजी महाराजांची जडणघडण’ विषयावरील व्याख्यानातून विद्यार्थ्यांना प्रेरणा…

⚡मालवण ता.२५-:आजच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून चांगले गुण आत्मसात करताना जीवनात त्यांचा उपयोग स्वतःच्या, कुटुंबाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी करावा, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक तथा भारतीय इतिहास संकलन समिती, कोकण प्रांताचे उपाध्यक्ष रविराज पराडकर यांनी येथे बोलताना केले वायरी भूतनाथ येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयात इतिहास अभ्यासक रविराज पराडकर यांचे “शिवाजी महाराजांची जडणघडण”…

Read More

आषाढी नामदिंडीत लायन्स क्लब मालवणकडून भाविकांची सेवाभावाने अल्पोपाहार व पाणी वाटप…

⚡मालवण ता.२५-:आषाढी एकादशीच्या पवित्र योगावर मालवण तालुक्यातील वायरी येथील प. पु. सदगुरु नामदेव महाराज मठाच्या वतीने आयोजित नामस्मरण पायी दिंडीत सेवा बजावत लायन्स क्लब मालवणच्या वतीने भाविकांना अल्पोपाहार व पाणी वाटप करण्यात आले. यावेळी काही वेळ नामदिंडी सोबत पायी चालत मालवण लायन्स क्लब सदस्यांनी भक्तिमय सोहळ्यात आषाढी वारीची सेवा बजावली. या सेवाकार्यास मालवण लायन्स क्लब…

Read More

बांद्यात निमजगा अंगणवाडीच्या चिमुकल्यांची आषाढी एकादशी निमित्त दिंडी…

⚡बांदा ता.२५-: आषाढी एकादशीच्या निमित्ताने बांदा येथील निमजगा अंगणवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत भक्तिमय वातावरणात दिंडी काढून वारकरी परंपरेचा संस्कार जपला. संत सोहरीबोनाथ आंबीये मंदिरातून सुरू झालेली ही दिंडी श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरापर्यंत उत्साहात काढण्यात आली.टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी” अशा जयघोषांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. दिंडीत सहभागी झालेल्या चिमुकल्यांचे भाविक आणि ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात…

Read More

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी पुन्हा डॉ. पंकज पाटील…

⚡कणकवली ता.२५-: कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यभार पुन्हा एकदा डॉ. पंकज पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. यापूर्वी त्यांनी काही महिने या पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळत रुग्णालयाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. या कालावधीत रुग्णालयातील विविध सुविधा वाढविण्यासाठी डॉ. पंकज पाटील यांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित शासकीय यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच विविध सामाजिक…

Read More

दोन वेळा शेतकरी कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या इतिहासातील एकमेव मुख्यमंत्री…

मंत्री नितेश राणे:कर्जमाफी, वीज माफी मुळे शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा ⚡कणकवली ता.२५-: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राज्यात प्रथमच दोन वेळा शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती जाहीर केली असून, महाराष्ट्राच्या इतिहासात दोन वेळा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारे देवेंद्र फडणवीस हे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केला. ४८ हजार…

Read More
You cannot copy content of this page