Headlines

एलएल.एम. परीक्षेत अॅड. समीर वंजारी यांचे उल्लेखनीय यश…

⚡सावंतवाडी ता.०१-: अॅड. समीर वंजारी यांनी एलएल.एम. परीक्षेत आपल्या महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल काँग्रेस परिवाराच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

अॅड. वंजारी हे काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष असून फोंडा येथील वैश्य समाज पतसंस्थेचे संचालक तसेच सिंधुदुर्ग जिल्हा फेडरेशनचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण, समाजसेवा आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय असलेल्या अॅड. वंजारी यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
एलएल.एम. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. वेदिका राऊळ यांचेही काँग्रेस परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. अॅड. समीर वंजारी आणि कु. वेदिका राऊळ यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

You cannot copy content of this page