⚡कुडाळ ता.०१-: अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त गुरु मठकर यांच्याकडून कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या नावाने दैवज्ञ गणपती मंदिरातील चांदीच्या गणेशमूर्तीवर विधिवत अभिषेक करण्यात आला. यावेळी निलेश राणे यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य लाभावे तसेच त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी करण्यात आली.

पुढील गणेश चतुर्थीपूर्वी निलेश राणे यांना मंत्रिपद मिळावे, अशी मनोकामनाही यावेळी व्यक्त करण्यात आली. तसेच पालकमंत्री नितेश राणे, निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर यांना सिंधुदुर्गातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा सामना करण्यासाठी शक्ती व बळ मिळावे, अशी प्रार्थना करण्यात आली.राणे कुटुंबीयांसह सर्वांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांच्या माध्यमातून जनसेवेची कार्ये अधिक प्रभावीपणे सुरू राहावीत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
