अमित परब यांचा टोला: विधानसभेला अर्चना घारे परब यांना पाठिंबा देण्याची रुपेश राऊळांनी हिम्मत दाखवावी..
⚡सावंतवाडी ता.१३-: मंत्री केसरकर व राजन तेली यांच्या विधानसभेच्या उमेदवारी बाबत रुपेश राऊळ यांनी चिंता करण्यापेक्षा आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्या व सावंतवाडी विधानसभेच्या इच्छुक उमेदवार असलेल्या अर्चना घारे परब यांना पाठिंबा देण्याची हिम्मत दाखवावी त्यानंतर महायुतीच्या नेत्यांची काळजी करावी असा टोला चराठा उपसरपंच अमित परब यांनी रुपेश राऊळ यांना लगावला.
दरम्यान दुसऱ्याच्या पक्षात लुडबुड करण्यापेक्षा स्वतःचा उमेदवार लोकसभेत राहतो की पडतो याची काळजी आता रुपेश राऊळांनी करावी मंत्री केसरकर व तेली एकत्र आल्याने रुपेश राऊळ यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते आता चलबीचल होऊन ते महायुतीच्या नेत्यांवर टीका करात आहे आशी देखील श्री.परब यांनी यावेळी केली.
यावेळी अमित परत पुढे बोलताना म्हणाले गेल्या दहा वर्षात एकही विकास प्रकल्प आणले नसून फक्त विरोध करण्याचं काम या खासदारांनी केलं आहे त्यामुळे इथली जनता आता पूर्णपणे त्यांना कंटाळलेली आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना घरी बसवल्याशिवाय गप्प बसणार नाही दरम्यान विनायक राऊ यांना हिम्मत असेल तर गेल्या दहा वर्षात सावंतवाडी तालुक्यात दिलेल्या विकास निधीचा हिशोब द्यावा असे आव्हान देखील श्री परब यांनी यावेळी केलं आहे.
