आमदार वैभव नाईक:लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार राहणार नाही..
⚡कणकवली ता.१३-: लोकसभा निवडणुकीनंतर आमदार नीतेश राणे आपल्या वडिलांच्या पराभवाचा हिशोब घेऊन बसणार आहे. नारायण राणे हे काँग्रेसमध्ये असताना पराभवानंतर सुदन बांदिवडेकर बाळा वळंजू यांच्याबाबत घडलेल्या घटनेबाबत भाजपच्या कार्यकर्त्यांनी विचार करावा, असा सल्ला आमदार वैभव नाईक यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
विजय भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. नाईक बोलत होते. यावेळी कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, डॉ. प्रथमेश सावंत आदी उपस्थित होते.
श्री. नाईक म्हणाले, राज्यात मविआचे सरकार होते, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यावेळी विकासनिधीबाबत राजकारण करता कोणत्याही पक्षाचा सरपंच असला तरी त्याच्या गावासाठी विकासनिधी निधी उपलब्ध करून दिला होता. आमदार नीतेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नारायण राणेंना मते न मिळाल्यास गावाच्या विकास निधी रोखला जाईल, अशी धमकी सरपंचांना देत आहेत. धमकी देणे राणेंची जुनी परंपरा आहे. अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली
