सचिन देसाई यांचा भाजपात प्रवेश…

⚡कणकवली ता.१३-: दिगवळे-बामंदेवाडीतील उबाठा सेनेचे कार्यकर्ते सचिन कृष्ण देसाई यांनी कनेडी येथील मेळाव्यात भाजपात प्रवेश केला. आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन देसाई यांनी हा प्रवेश केला. केद्रीयमंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांच्या हस्ते त्यांना भाजपची शाल घालून पक्षात स्वागत करण्यात आले.


यावेळी आमदार नीतेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत, माजी जि प अध्यक्ष संजना सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, भाजपा अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, सुरेश सावंत, सांगवे संजय सावंत, सुरेश ढवळ, दारीसते उपसरपंच संजय सावंत, विजय बोभाटे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page