Headlines

महायुतीच्या प्रचारकार्यालयाचे उद्घाटन रद्द कोणाच्या हट्टापायी…?

राजन तेली यांनी स्टेटस चर्चेत.:नेमका रोष कोणावर..

सावंतवाडी-: येथील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे आज सकाळी होणारे उद्घाटन अचानक रद्द झाले.नियोजित असलेला हा कार्यक्रम नेमका कोणामुळे रद्द झाला हा प्रश्न सकाळी उद्घाटनासाठी तालुक्यातून आलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना पडला. मात्र माजी आमदार राजन तेली यांनी लावलेला स्टेटस चर्चेचा विषय ठरला आहे.

त्यांनी स्टेटस च्या माध्यमातून कार्यकर्त्यांची माफी मागताना नियोजित सभा कोणाच्यातरी हट्टामुळे दोन वेळा रद्द झाल्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत करून सभेचे नियोजन केले होते त्यामुळे त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनापासून माफी मागतो चा त्यांनी स्टेटस ठेवून एकीकडे आपली नाराजी ही व्यक्त केली आहे परंतु हट्ट करणारा नेमका व्यक्ती कोण असा प्रश्न आता सावंतवाडी तालुक्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये पडला आहे एकूणच त्यांचा हा रोष मंत्री दीपक केसरकर यांच्यावर तर नाही ना तेही बोलले जात आहे. दरम्यान याबाबत श्री तेली यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल स्विच ऑफ येत होता.

You cannot copy content of this page