शैक्षणिक उठावातून छप्पर दुरुस्ती, फरशीचे काम…

पाडलोस शाळा नं.1 चे सौंदर्य खुलले : पालक, ग्रामस्थ, शिक्षकांनी केले श्रमदान..

⚡बांदा ता.१२-: पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 चे छप्पर मोडकळीस आले होते. पावसाळ्यात गळती लागत होती. विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत होता. याची दखल पालकांनी घेऊन ग्रामस्थ व शिक्षकांच्या सहकार्याने श्रमदानातून ‘गाव करी ते राव करी’ या उक्तीनुसार एकीच्या बळावर शैक्षणिक उठावातून नवीन फरशी व छप्पर दुरुस्तीचे काम मार्गी लावले. नवीन कामामुळे शाळेचे सौंदर्य खुलून दिसले.
शाळेची इमारत दगडी आहे मात्र छप्पर दुरुस्तीस आले होते. दिवसेंदिवस वाढत्या उष्म्याचा फटका बसत असतानादेखिल ग्रामस्थांनी चार दिवस श्रमदान केले. भर उन्हात पुरुषांसोबत महिलांनीही शैक्षणिक कार्यात सहभाग घेतला.
गोविंद माधव, सुधीर गावडे, चंद्रकांत नाईक, अनुराज गावडे, विष्णू गावडे, नंदा गावडे, सचिन गावडे, साहिल गावडे, आर्यन गावडे, कृष्णा सातार्डेकर, बाबलो मेस्त्री, रामा गावडे, निलेश माधव, विजय गावडे, बापू गावडे, केशव आईर, नाना गावडे, मन्या गावडे, शिवराम पाडलोसकर, तेजल गावडे, दीप्ती करमळकर, शीतल गावडे, संतोष आंबेकर, विठू गावडे, प्रजोत माधव, लक्ष्मी गावडे, मुख्याध्यापक अनिल वरक, शिक्षक राहुल वाघधरे, तसेच प्रशांत वराडकर, संतोष गावडे, अशोक गावडे, तुषार गावडे, सतीश पेडणेकर, सुनिल गावडे, सुनीता गावडे, गायत्री गावडे, अंकुश राणे, सायली गावडे यांनी शैक्षणिक कार्यात हातभार लावला.

You cannot copy content of this page