माजी आमदार परशुराम उपरकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने होणार साजरा…

⚡सावंतवाडी ता.१२-: माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या 14 एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.यात सावंतवाडी येथील माऊली मतिमंद मूक बधिर व कर्णबधिर शाळेत मुलांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम व केक कापण्यात येणार असून शिरोडा येथे यशवंत गड किल्ल्यावर वाढदिवसानिमित्त दोन कुंड्या देण्यात येणार आहेत तर उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम दोडामार्ग येथे गरजू कुटुंबांना धान्य वाटप तसेच लहान मुलांना बॅग वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असूनत नावेली रेवटेवाडी येते क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते तथा माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी दिले.

व रविवारी कणकवली येथे वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री सुभेदार यांनी केले.

You cannot copy content of this page