महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांचे आवाहन:भाजपची बांदा मंडल महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर..
⚡बांदा ता.१२-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती केली. अनेक लोकहिताचे निर्णय झालेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव अग्रक्रमावर नेले. अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानात बदल झाले. मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून देण्यासाठी सर्वांनी संघटितपणे काम करूया, असे आवाहन भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी बांदा येथे केले.
बांदा मंडल महिला मोर्चा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. नूतन कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यात अध्यक्षपदी रूपाली शिरसाट (बांदा), सरचिटणीस राखी कळंगुटकर (वाफोली), शितल नाईक (धाकोरे), उपाध्यक्ष गौरी पावसकर (चराठा), श्वेता दळवी (न्हावेली), श्रद्धा सावंत (माजगाव), सानिका गावडे (मडूरा), लक्ष्मी सावंत (बांदा), सुचिता शिंदे (इन्सुली), चिटणीस पदी प्रज्ञा देसाई (पडवे माजगाव), प्रतिक्षा मांजरेकर (सातोसे), श्रुती वळंजू (बांदा), मिलन पार्सेकर (मळेवाड), कोषाध्यक्षपदी राखी मिशाळ (आरोसबाग), सदस्य पदी सोनम कवठणकर (कवठणी), साक्षी शिरोडकर (वाफोली), नमिता शेगडे (रोनापाल), डॉ. अर्चना सावंत (माजगाव), प्रतिभा गवस (नेतर्डे), प्रिया नाटेकर (इन्सुली), मुग्धा रेडकर (मळेवाड), प्रगती देसाई (डेगवे), मनाली आरोसकर (आरोस), उज्वला बुराण (ओटवणे), वेदिका नाईक (तांबुळी) यांचा समावेश आहे.
यावेळी बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर, बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, माजी सभापती मानसी धुरी, माजी उपसभापती शितल राऊळ, बांदा उपसरपंच बाळू सावंत, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, सिद्धेश महाजन, ग्रा. पं. सदस्य रत्नाकर आगलावे, मकरंद तोरसकर, देवल येडवे, दीपलक्ष्मी सावंत पटेकर, रेश्मा सावंत, तनुजा वराडकर, श्रिया केसरकर, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, हुसेन मकानदार, गुरू कल्याणकर, रोणापाल सरपंच योगिता केणी, बूथ अध्यक्ष अनादी गावडे, माधवी गाड, गुरू धारगळकर, साहिल कल्याणकर आदी उपस्थित होते.
